साधना संवाद: अध्यात्मावरील प्राथमिक सत्संग

Satsang Language : Marathi

ऑनलाइन ‘साधना संवाद’ हे सत्र आपल्या जीवनाला आनंदी बनवण्याचे आध्यात्मिक द्वार आहे. आध्यात्मिक प्रगती करून जीवनात आनंद प्राप्त करण्यासाठी या सत्संगामध्ये अवश्य सहभागी होऊया. ‘साधना संवाद’मध्ये सहभागी होऊन आमच्या ‘साधना सत्संगा’मध्ये सहभागी होण्यासाठी कृपया खाली नोंदणी करा !

 

‘साधना संवाद’मध्ये आपण साधना करताना येणारे अनुभव-अनुभूती मोकळेपणे सांगू शकता. या अनुभवांचे या संवादामध्ये आध्यात्मिक विश्लेषण केले जाईल. तसेच या संवादामध्ये आपण साधना करतांना आपल्या मनात उद्भवणारे प्रश्न आणि येणार्‍या अडचणी यांविषयीही मोकळेपणाने विचारू शकता.हे ‘साधना संवाद’ सत्संग प्रत्येक रविवारी सोयीच्या वेळांमधे आयोजित केले जातात.हा ‘साधना संवाद’ हा Google Meet या ॲप्लीकेशनच्या माध्यमातून असेल.

 

आपण ‘साधना संवाद’मध्ये सहभागी झाल्यानंतर आम्ही आपल्याला नियमित साप्ताहिक सत्संगाला जोडून देऊ, जेथे आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन केले जाईल. हेच सत्संग आपल्या आनंदी जीवनासाठी अधिक उपयुक्त ठरतील !

 

सनातनच्या ‘साधना सत्संगा’ची वैशिष्ट्ये :

आपल्या प्रकृतीनुसार आणि क्षमतेनुसार योग्य आणि सुलभ साधनेचे मार्गदर्शन !

जीवनातील आध्यात्मिक समस्यांविषयी आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात दिशादर्शन !

अध्यात्म आणि साधना संबंधित शंकांचे निरसन !

आपण सनातन संस्थेच्या सत्संगात येत असाल, तर आपल्याला ‘साधना संवाद’साठी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

हे ‘साधना संवाद’ मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या भाषांमध्ये आहेत. यापैकी आपणाला सोयीस्कर भाषेसाठी आपण नोंदणी करू शकता !

चला, तर मग सनातन संस्थेच्या ‘साधना संवाद’साठी आताच नोंदणी करा..

Date and Time

Sunday, 01 May 2022

4:00 pm - 5:30 pm

Registration is closed